
विश्वप्रार्थना - सामूहिक पसायदान पठण
दि.१० जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल.
मन, बुद्धी आणि आचरण शुद्ध करण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत आहे. ही प्रार्थना सामुदायिक असेल तर प्रेम, सेवा आणि करूणा ही मूल्ये सहजतेने रूजतात. ही प्रार्थना ज्ञानोबा माऊलींचे पसायदान असेल तर त्यातून सुख, शांती आणि जागच्या कल्याणाचे वरदान मागितले जाते. स्वचिंतेत व्यग्र असलेल्या आजच्या समाजात पसायदान परस्परांत आपुलकी आणि मैत्रभाव निर्माण होण्याचा उदात्त विचार मांडते. हाच उदात्त विचार पुढे नेण्यासाठी पंढरीच्या वारीचे औचित्य साधून सामुदायिक पसायदान पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.१० जुलैरोजी रात्री ९ वाजता भवानी पेठ येथे सामुदायिक पसायदान पठण होईल. या प्रार्थनेत काही जण प्रत्यक्ष सहभागी होतील. मात्र तंत्रज्ञानाच्या सहकार्याने जगभरातील भक्तगणांना या सामुदायिक पसायदान पठणात सहभागी होण्याची संधी लाभते आहे. सोबत दिलेल्या डिजिटल लिंकव्दारे सामुदायिक पसायदान पठणात सहभागी होत विश्वकल्याणाचा मार्ग प्रशस्त करूया! विठ्ठल.. विठ्ठल... सेवा हीच वारी, राम कृष्ण हरी!